गणेशोत्सव 2013
Lalbaugcha Raja 2013
गणेशोत्सव साजरा करणे
सुखकर्ता, विघ्नहर्ता अन् अष्टदिशांचा अधिपती म्हणजे श्री गणपति ! वेदांच्या माध्यमातून धर्मशास्त्र सांगणारी ही देवता जशी विद्यापती आहे, तशीच ती असुरांचा नाश करणारीही आहे. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने धर्माचरण शिकणे, तसेच गणेशोत्सवातील अपप्रकारांचे उच्चाटन करून धर्मरक्षणाचा संकल्प करणे, ही श्री गणेशाची खरी उपासना ठरेल !
अनु. क्र. | गणेशोत्सवात हे नसावे ! | गणेशोत्सवात हे असावे ! |
१.
|
वर्गणी बळाने वसूल करणे
|
ऐच्छिक वर्गणी स्वीकारणे
|
२.
|
‘प्लास्टर ऑफ पॅरीस’पासून बनवलेली अशास्त्रीय अन् अवाढव्य मूर्ती
|
शाडू वा चिकणमाती यांपासून बनवलेली अन् नैसर्गिक रंगांत रंगवलेली लहान मूर्ती
|
३.
|
थर्माकोलची सजावट, भव्य मंडप आणि विद्युत लखलखाट (रोशणाई)
|
नैसर्गिक पाना-फुलांची सजावट, लहान मंडप आणि दिव्यांची आरास
|
४.
|
फटाके, वाद्यवृंद आणि चित्रपटगीते यांमुळे होणारे ध्वनी अन् वायू प्रदूषण
| |
५.
|
विसर्जन मिरवणुकीत गुलाल, हिडीस नाच, स्त्रियांशी असभ्य वर्तन अन् मद्यपान
|
विसर्जन मिरवणुकीत श्री गणपतीचानामजप अन् रात्री १० पूर्वी तिची सांगता
|
श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते.
|
सुखकर्ता, विघ्नहर्ता अन् अष्टदिशांचा अधिपती म्हणजे श्री गणपति
|
गणेशमूर्ती अन् निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जित का करावे, याविषयीची माहिती या लेखातून समजून घेऊया.
|
गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. गणेशमूर्तीची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आणि त्यातून गणेशपूजनाचा लाभ करून घेण्यासाठी पुढील लेख उपयुक्त आहे.
|